गोंदिया : ३१ डिसेंबर साजरा करण्याला नक्षलवाद्यांनी विरोध केलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यात नागझिरा पर्यटन तसेच अभ्यारण्यात नक्षलींतर्फे बंदची हाक देण्यात आलीय.
त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
'नागझिरा बंद, दम है तो नागझीरा आवो', असे लिहिलेले बॅनर नागझिरा पारिसरात लावले आहेत.
नक्षलींनी, परिसरात मोठी दहशत पसरवलीय. त्यामुळं पोलिसांचा मोठा फौज फाटा घटना स्थळी रवाना झालाय.