‘आता मी पण भाजपमध्ये जायला पाहिजे का?’ ED च्या कारवाईनंतर रोहित पवार यांचं ट्विट

रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.  161 एकर जागा ED ने ताब्यात घेतली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 8, 2024, 06:18 PM IST
‘आता मी पण भाजपमध्ये जायला पाहिजे का?’ ED च्या कारवाईनंतर रोहित पवार यांचं ट्विट  title=

Rohit Pawar ED Raid :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.  बारामती अॅग्रोची कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय (Baramati Agro Money Laundering Case). जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आता मी पण भाजपमध्ये जायला पाहिजे का? असा सवाल उपस्थित रोहित पवार यांनी कारवाईबाबात प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे रोहित पवार यांची प्रतिक्रिया

रोहित पवार X या सोशल मिडिटा प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.  माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही!

 

वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी पोस्ट करत रोहित पवार यांनी कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.