नागपूर : मोठा गाजावाजा करत नागपूर मेट्रो सुरु करण्यात आली. मात्र, या मेट्रोला प्रवासी मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे अनेकवेळा मेट्रो रिकाम्या धावताना दिसत आहेत. अल्प प्रतिसादामुळे मेट्रोमध्ये युवक काँग्रेसने अनोख आंदोलन केले. कोट्यवधी रुपये खर्च करून नागपूर मेट्रो सुरु करण्यात आली. मात्र प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने मेट्रो रिकामीचा धावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसने मेट्रोत आढावा बैठक घेत अनोखे आंदोलन केले.
सीताबर्डी ते खापरी दरम्यान रिकाम्या धावणा-या मेट्रोमध्येच युवक काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. इतकचं नव्हे तर मेट्रोमध्येच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थोडीसी वामकुशीही घेतली. अनेक कार्यकर्ते मेट्रोमध्ये आडवे झोपले होते. नागपूर मेट्रो सध्या सीताबर्डी ते खापरी दरम्यान धावत आहे. मात्र सुरु होवूनही सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत मेट्रोला नागपुरकरांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
मेट्रोच्या बर्डी ते खापरी दरम्यानच्या फेरी सुरु असल्या तरी प्रवासांची संख्या अगदीच अत्यल्प अशीच आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही नागपूर मेट्रोला रिकामीचा धावतानाच चित्र दिसत असल्याने, याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा काँग्रेसने काल मंगळवारी हे आंदोलन केले. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत नागपूरात मेट्रो सुरु केली. मात्र तोट्यात असलेल्या नागपुर मेट्रोला महसूल मिळावा, या हेतूने मेट्रोत युवक काँग्रेसची बैठक घेतल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.