धक्कादायक! मूकबधिर मुलाचा सावत्र आईकडून अमानवीय छळ, गुप्तांगाला चटके

नाशिक महिला सुरक्षा शाखेची धक्कादायक माहिती 

Updated: Jun 8, 2021, 02:33 PM IST
 धक्कादायक!  मूकबधिर मुलाचा सावत्र आईकडून अमानवीय छळ, गुप्तांगाला चटके title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यात मुलांच्या छळवणुकीचा अमानवी प्रकार उघड झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील  मूकबधिर मुलाला सावत्र आईकडून अत्यंत अमानवीय पद्धतीने छळ होत असल्याचं उघड झालं आहे. या मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले जात होते . ही घटना निळवंडी पाडे इथे घडल्याचे समोर आले आहे. 

या घटनेचाही एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत पीडित मुलाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलेय .कोरोनामुळे गृहकलह मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात बळी ठरतायेत असहाय लहान मुले. , महिलांचे नानाविध व्हिडिओ समाज माध्यमांतून सतत व्हायरल होत असल्याने , या विषयावर आता बऱ्यापैकी समाजजागृती होत आहे . मात्र  त्याच वेळी दुसरीकडे असे अनेक प्रकारही सातत्याने उघडकीस येत आहेत .

नाशिक महिला सुरक्षा शाखेची धक्कादायक माहिती 

_जानेवारी 2020 पासून आलेल्या तक्रारी 1333
_दुसऱ्या लॉक डाऊन च्या काळात आलेल्या तक्रारी 431
_चालू वर्षी 133 तर मागील वर्षी 826 तक्रारींची निर्गती
_293 अर्जांची चौकशी अद्याप सुरू
_यावर्षी 131 वाद शमले 31 विवाहिता पुन्हा सासरी
_गेल्या वर्षी267 तक्रार अर्जांवर न्यायालयाने समझोता घडवून आणला
_119 विवाहितांनी पुन्हा सासरची पायरी चढली

वाद होण्याची प्रमुख कारणे 

मोबाइल मग्नता हे मुख्य कारण
घरात मुलांची जबाबदारी न घेणे ,
पतीने पत्नीची बाजू न घेणे

यासारख्या कारणांमुळे वाद होण्याची शक्यता असते. यामुलावर आता रूग्णालयात उपचार सुरू आहेत.