नागपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी शक्य असेल तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
खडसे आणि पवारांची अज्ञातस्थळी भेट, अर्धा तास चर्चा
आम्ही समान किमान कार्यक्रमाच्याआधारे वाटचाल करत आहोत. त्यामुळे राज्यातील निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे एकत्र येऊन महाविकासआघाडीचा विजय करणे, हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी अगदी जिल्हा परिषद पातळीवरही आमची एकत्र येण्याची तयारी आहे. याठिकाणी ज्याचे जास्त सदस्य असतील त्याचा अध्यक्ष होईल, अशा सूचना आम्ही आतापासूनच द्यायला सुरुवात केली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप
तसेच थोड्याच दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत खातेवाटप निश्चित होऊन पुढील आठवड्यात प्रत्यक्षात मंत्रिमंडळ वाटप होण्याची शक्यता आहे.