'स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीचं हलाहलही पचवू'

'सामना'तून भाजपावर निशाणा

Updated: Nov 13, 2019, 09:10 AM IST
'स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीचं हलाहलही पचवू' title=

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. कोणताच पक्ष दिलेल्या वेळेत बहुमत स्थापन करु न शकल्याने अखेर हा निर्णय झाला. दरम्यान शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीचं हलाहलही पचवू अशी टीका आजच्या सामनामधून भाजपवर करण्यात आली आहे. आम्ही नाही तर कोणीच नाही हा अहंकार राज्यासाठी घातक असल्याची टीका करण्यात आली आहे. 

ठरल्याप्रमाणे भाजप वागला असता तर आज अशी परिस्थिती आली नसती. तत्व, नितीमत्ता, संस्कारातल्या भाजपाने हे गुण महाराष्ट्रातही दाखवायला हवे होते. कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही आणि राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसायचे हा खेळ सुरु असल्याची बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

काश्मीरात मेहबुबा आणि बिहारात नितिश कुमार यांच्याशी घरोबा करताना तत्वे आणि विचारांचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.