पुणे : किल्ले शिवनेरी म्हणजे शिवप्रेमींचं तिर्थस्थळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला, त्याच किल्ल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
काही शिवप्रेमींनी या मद्यधुंद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दारुसह रंगेहात पकडलं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. या कर्मचाऱ्यांना रात्री पोलिसांनी अटक करुन जामिनावर त्यांची सुटकाही केली. शिवजयंतीच्या पुर्वसंध्येलाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात काही पर्यटक सोबत दारू घेऊन जात असल्याच्या तक्रारी आहेत, मात्र येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच दारू प्यायला सुरूवात केली आहे.