Bhaskar Jadhav lost Posters in Mumbai : ठाकरे गटाचे (Thackeray Group ) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजपकडून (BJP) बॅनरबाजी करण्यात आली आहे. भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आपण यांना पाहिलात का? जाधवांना शोधून देण्याऱ्याला 11 रुपये बक्षीस देऊ असा मजकूर छापण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपकडूनही भास्कर जाधव यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अशांतता, वाद निर्माण करण्याचं काम ठाकरे गटातले बाटगे करतात, अशी टीका भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केली. भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यावर शेलार यांनी नाव घेऊन टीका केली आहे.
नवी मुंबईत ठाकरे गटाला विना परवाना मोर्चा काढणं भोवले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस यंत्रणा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं तीन नेत्यांना महागात पडले आहे. भास्कर जाधव, अरविंद सावंत आणि विनायक राऊतांवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबईत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नवी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. सरकार आणि पोलिसांची दपशाही आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चानंतर मीडिया सोबत संवाद साधताना राणे यांच्यावर टीका केली होती.
याप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात भाजप सदस्य आणि राणे समर्थक सोहम काटे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अब्रूनुकसान, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान, चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर जाधव यांच्याबरोबर अंबादास दानवे आणि अरविद सावंत यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पोलीस यंत्रणा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्य व्यक्तव्य केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातबरोबर विना परवाना मोर्चा काढल्यामुळे शिवसेनेचे 20 पदाधिकारी आणि 700 कार्यकर्त्यां विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आला आहे.