सोनू भिडे, नाशिक:- हौसेला मोल नसत असे म्हणतात...... आणि हीच हौस पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करतो. असेच काहीस केलंय एका व्यक्तीने आणि यामुळे त्याची फजिती सुद्धा झालीय. करोडो रुपये किंमतीची लम्बोर्घिनी (Lamborghini) कंपनीची कार (Car) भर रस्त्यात (On Road) बंद पडली होती. बंद पडलेल्या कारला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर शहरातील खड्यांमुळे खड्ड्यांमुळे हि कर बंद पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.
काय घडले
नाशिक (Nashik) मधील महागड्या गाड्यांचा शोकीन असलेल्या व्यक्तीने करोडो रुपयांची लम्बोर्घिनी कार आणली. हि कार आणल्यानंतर तिला बघण्यासाठी परिसरातील तसेच शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी (Crowd) केली होती. कार चालक गाडीचा मालक हि गाडी घेऊन शहरात फिरत होता. सिग्नलवर कार थांबल्यानंतर नागरिकांची या गाडीवरून नजर हटतच नव्हती. मात्र मंगळवारी नाशिकच्या सिडको परिसरात गाडी रस्त्यावरून जात असताना अचानक बंद पडली. चालकाने प्रयन्त करून सुद्धा कार चालू न झाल्याने अखेर नागरीकांच्या मदतीने कारला धक्का देत घरापर्यंत नेण्यात आलं. एवढी महागडी कार ढकलत नेत असताना पाहून नागरिक आचार्यचकित होऊन कार कडे बघत होते. मात्र यामुळे कार चालकाची मोठी फजिती बघायला मिळाली.
झी २४ तासचा मागोवा
झी २४ तासने लम्बोर्घिनी कारची बातमी प्रसारित केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काहीतरी घोळ असल्याचा अंदाज झी २४ तासाच्या टीमला आला. या घटने मागील सत्य जनते समोर आणण्यासाठी घटना स्थळी तपास सुरु केला यात काही तथ्य समोर आले आहेत.
नेमक तथ्य काय?
आपल्या दाराशी महागड्या लक्झरी गाड्या असाव्यात अशी हौस प्रत्येक व्यक्तीला असते. नासिक मधील एका व्यक्तीला महागड्या आणि लक्झरी गाडीत फिरण्याची हाउस होती. मात्र ती खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा नसल्याने त्याने एक अनोखी शक्कल लढविली. यासाठी त्याने एक कार खरेदी केली. या कारच्या इंजिनाचा वापर करून त्या कारला लम्बोर्घिनी (Lamborghini) या महागड्या कारचा लुक दिला. आणि हि कार घेऊन तो नाशिक शहरात फिरत होता. करोडो रुपयांची महागडी कार शहरात अल्याने नागरिकही त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी करत होते. मात्र मंगळवारी हि कार भर रस्त्यात बंद पडली होती.
लम्बोर्घिनी कारचे वैशिष्ट
लम्बोर्घिनी कारचे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारचा कमाल वेग ताशी 325 किमी असून 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास आणि 9.1 सेकंदात 200 किमी प्रतितासाचा वेग पकडू शकते.