नागपूर : Sharad Pawar on Election Commission : शिवसेनेत (Shiv Sena) मोठी उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर धनुष्यबाणावर शिंदे गटाने (Shinde Group) दावा केल्याने याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंतीम मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आजच कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेसह सगळ्यांचे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत आता राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारतीय निवडणूक आयोग (Election Commission) जो काही निर्णय देईल तो सर्व पक्षांना मान्य करावा लागेल. दरम्यान, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे. त्याबाबत पवारांनी हे वक्तव्य केलंय.
निवडणूक आयोगानं त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर करणार करणार असून, ठाकरे गट दुपारी 1 वाजता निवडणूक आयोगाला भेटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पत्राची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवलं. पण, ठाकरे त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही, तोपर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी अजून 4 आठवडे लागणार असल्याची विनंती उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला करणार आहेत.
धनुष्यबाण चिन्हासाठी शिवसेनेच्या ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटात (Shinde Group) आज शनिवारी निवडणूक आयोगापुढं (Election Comission) सुनावणी होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) एकनाथ शिंदे गटानेही धनुष्य बाण चिन्हावर दावा ठोकला आहे. त्यामुळं पोटनिवडणुकीआधी धनुष्य बाण चिन्हाचा फैसला होईल का? याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लागल्यात. कारण धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाला द्यायचं की, एकनाथ शिंदे गटाला याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. येत्या 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्य बाण चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या या मागणीचं पत्र ठाकरे गटाला ईमेलवरून पाठवले आहे. यासंदर्भात 8 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडा, असे आदेश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले आहे. या मुदतीत उत्तर दिले नाही तर निवडणूक आयोग योग्य ती कार्यवाही करेल, असा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा लेखी पत्राद्वारे मुदतीची मागणी केली आहे. त्यामुळे आता काय होणार याची उत्सुकता आहे.