शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठ थोपटली!

 विधानपरिषद  निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी खूप जोर लावल्यामुळं जागा गेली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केलीय. 

Updated: Jun 12, 2018, 07:38 PM IST
शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठ थोपटली! title=

सोलापूर : बीड, उस्मानाबाद विधानपरिषद  निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी खूप जोर लावल्यामुळं ही जागा गेली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलीय. राज्यातील प्रभावी घटकांना एकत्र करून भाजपला पर्याय देता येऊ शकतो, असा पुनरूच्चारही त्यांनी केला. सोलापुरातील कुर्डुवाडीमध्ये शिक्षणमहर्षी के. एन. भिसे यांच्या पुतळ्याचं अनावरण पवारांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आंबे खाल्ल्यानं मुलं होतात, या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरही पवारांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

उस्मानाबाद बीड निवडणुकीनंतर पवार यांनी आघाडीचे  भाकित केले. राज्यातील  प्रभावी नेते एकत्र करुन भाजपला पर्याय निर्माण करु असे ठामपणे  व्यक्त करीत निवडणुकीनंतर सर्वाना एकत्रीत करुन एकाचे नाव पुढे करु, असे विधान शरद पवार यांनी कुर्डवाडीत केले, ते एका कार्कमात बोलत होते, प्रभावी नेते एकत्र करुन भाजपाला पर्याय उभा करणार, असे स्पष्ट केले. 

अलीकडे समाजाला चांगले मार्गदर्शन करणारे आध्यात्मिक गुरु कमी होत आहेत. मुलगा होत नसेल तर आंबा खा असे एक गुरुजी सांगत आहेत. आधीच देशाची लोकसंख्या वाढत आहे आणि त्यात अंब्याची फळझाडे वाढवायला सांगतायेत, असे म्हणत भिडे गुरुजींचा खरपूस समाचार घेतला. आंबे खाल्ले आणि लोकसंख्या वाढली तर देशाचे काय व्हायचे? अशा लोकांपासून दूर रहायला हवे. भिडे गुरुजींवर शरद पवारांची मिश्किल टीका करीत गुरुजींना चिमटा काढलाय.