पुणेरी पगडी वादावर शरद पवारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न

 पुणेरी पगडी वादावर पडदा टाकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न केला. 

Updated: Jun 16, 2018, 07:40 PM IST
पुणेरी पगडी वादावर शरद पवारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न  title=

पुणे : आपण पुण्यात शिकलो असून पुण्याचा आपल्याला अभिमान आहे, असे सांगत पुणेरी पगडी वादावर पडदा टाकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न केला. कुठल्याही वर्गाविरोधात भूमिका मांडली नसल्याचेही स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले. पुणेरी पगडी संदर्भात मांडलेली भूमिका कुठल्या एका वर्गाच्या विरोधात नव्हती असं सांगत शरद पवार यांनी या विषयावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

 पक्षाच्या पुण्यातील कार्यक्रमात पवार यांना पुणेरी पगडी घालण्यात आली होती. त्याविषयी नाराजी व्यक्त करत पवार यांनी पक्षाच्या यापुढील कुठल्याही कार्यक्रमात उपस्थितांना फुले पागोटा देऊन सन्मानित करण्याच्या सूचना केल्या होत्या. पवारांच्या या कृतीमुळं पुणेकरांसह विचारवंतांकडून उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची जाणिव झाल्यानंतर पवारांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात पगडी विषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात बोलताना माझा पुण्याचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, मी पुण्यात शिकलोय, पुण्याचा मला अभिमान आहे असं पवारांनी यावेळी सांगितलं. 

आधी पुण्यात पाहा काय बोलले पवार?