राज ठाकरेंचा 'रॅपिड फायर' आणि पवारांची फटकेबाजी

'जागतिक मराठी अकादमी'च्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमानिमित्तानं एक अनोखा योग जुळून आला. या मंचावर चक्क शरद पवार यांना 'रॅपिड फायर' प्रश्न विचारण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2018, 09:44 PM IST
राज ठाकरेंचा 'रॅपिड फायर' आणि पवारांची फटकेबाजी  title=

पुणे : 'जागतिक मराठी अकादमी'च्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमानिमित्तानं एक अनोखा योग जुळून आला. या मंचावर चक्क शरद पवार यांना 'रॅपिड फायर' प्रश्न विचारण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली...

रॅपिड फायर : यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी

- एका वाक्यात उत्तर देता येणार नाही... एकाचं कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं... तर दुसऱ्याचं आंतरराष्ट्रीय जाण पण कार्य देश आणि महाराष्ट्र पातळीवर

रॅपिड फायर : शेतकरी की उद्योगपती?

- देश शेतकऱ्यांचा जास्त त्यामुळे 'शेतकरी'

रॅपिड फायर : अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती

- उद्योगपती

रॅपिड फायर : दिल्ली की महाराष्ट्र ? 

- दिल्लीच... महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात असायला पाहिजे

रॅपिड फायर : भाजप की काँग्रेस?

- केव्हावी काँग्रेस

रॅपिड फायर : राज की उद्धव?

- ठाकरे कुटुंबीय 

अधिक वाचा : 'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'

अधिक वाचा : शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

अधिक वाचा : कमळीची काळजी करू नका, बाळासाहेबांनी दिला होता शरद पवारांना भरवसा...

 

हीच प्रश्नोत्तर फटकेबाजी पाहा व्हिडिओतून...