शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड

शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड झालंय.

Updated: Aug 12, 2018, 04:13 PM IST
शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड title=

मुंबई : नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरचे कोल्हापूर कनेक्शनही उघड झालंय. एटीएस आणि कोल्हापूर पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात येतोय. तसंच कोल्हापुरातील अनेकांची चौकशीही करण्यात येतेय. शरद कळसकर हा मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरीचा आहे.. २५ वर्षाच्या शरदचचं १२वी पर्यंत शिक्षण झालंय.. एप्रिल महिन्यात तो गावी आला होता आणि जूनला परत कोल्हापूरला गेला. चार-पाच महिन्यातून तो एकदा गावी यायचा... आणि घरच्यांना पाच दहा हजार रुपये द्यायचा..  कोल्हापुरातून चांगलं शिक्षण घेऊन त्याला स्वतःचा उद्योग  उभारण्याचं त्याचं स्वप्न होतं.

मूळचा औरंगाबाद

सनातन प्रकरणात अटक झालेला शरद कळसकर हा मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरीचा आहे.. २५ वर्षाच्या शरदचचं १२वी पर्यंत शिक्षण झालंय.. एप्रिल महिन्यात तो गावी आला होता आणि जूनला परत कोल्हापूरला गेला. गेली पाचवर्ष तो कोल्हापूला असल्याचं त्यानं घरी सांगीतलं होतं.. तीथं लेथ मशीनच्या फीटरचं काम करत असल्याचं त्यानं घरच्यांना सांगीतलं होतं. त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर अल्पभूधारक शेतकरी आहेत.

मोबाईल वापरत नव्हता

सनातन प्रकरणातील अटक झालेला शरद कळस्कर हा मोबाईल वापरत नव्हता अस त्याच्या सर्व नातेवाईकांचे म्हणणं आहे. यामागचं कारण कोणालाच माहिती नाही.. चार-पाच महिन्यातून तो एकदा गावी यायचा... आणि घरच्यांना पाच दहा हजार रुपये द्यायचा..  कोल्हापुरातून चांगलं शिक्षण घेऊन त्याला स्वतःचा उद्योग  उभारण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्याचे हे वेगळेच उद्योग सुरू होते याची पुसटशी कल्पनादेखील घरच्यांना नाही.