एजंटगीरीमुळे पिवळे रेशन कार्ड मिळेना, त्रस्त नागरिकाचे टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

Sholey Style agitation: पिवळ्या रेशनकार्डसाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने चक्क टॉवरवर चढुन शोले स्टाईल आंदोलन केले.

Updated: Mar 3, 2024, 07:03 AM IST
एजंटगीरीमुळे पिवळे रेशन कार्ड मिळेना, त्रस्त नागरिकाचे टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन title=
Sholey Style agitation

Sholey Style agitation: शहापुरात  सध्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. शासनाच्या विविध योजनांचा नागरीकांना थेट लाभ देणे आणि शासनाच्या विविध विकास योजनांचा प्रचार प्रसार करण्याची संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातुन राबवली जात आहे. असे असताना पुरवठा विभागाच्या गचाळ कारभाराची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना नुकतीच शहापुरात घडली आहे. 

पिवळ्या रेशनकार्डसाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने चक्क टॉवरवर चढुन शोले स्टाईल आंदोलन केल्याने पुरवठा विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

शहापुरातील पुरवठा कार्यालयात हा प्रकार घडला. माहुलीच्या काटेकुवी पाडा येथील रहिवासी रामचंद्र परशुराम ठाकरे हे गेल्या आनेक दिवसापासुनपिवळ्या रेशन कार्डसाठी खेटे मारत होते. पण शासकीय आधिकाऱ्यांच्या अनास्थेला ते कंटाळले.

पुरवठा विभागात वाढलेल्या एजंटगीरीमुळे त्यांना पिवळे रेशन कार्ड मिळत नव्हते. त्यामुळे वैतागलेले रामचंद्र शहापूर तहसील कार्यालया शेजारील टॉवरवर चढले आणि त्यांनी शोले स्टाइल अनोखे अंदोलन केले. 

निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, 'त्या' भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख

अखेर शहापूर जिवनरक्षक टिमने धाव घेवून रामचंद्र ठाकरे यांना पिवळे रेशन कार्ड देण्याचे आश्वासन दिले. यानंतर ते खाली उतरले.  या घटनेमुळे शहापूर पुरवठा विभागाच्या अब्रुची लख्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! 24 तासात सोन्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ