ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Seventh Pay Commission News : दिवाळी सणाच्या आधी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. 

Updated: Oct 6, 2021, 08:04 AM IST
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा title=
संग्रहित छाया

मुंबई : Seventh Pay Commission News : दिवाळी सणाच्या आधी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation employees) सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) लागू करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी याबाबत घोषणा  केली आहे. (Seventh Pay Commission for Thane Municipal Corporation employees, Minister Eknath Shinde's big announcement)

ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले. या कामाची दखल घेऊन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा काळ अत्यंत अवघड काळ होता. मात्र अशावेळी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. सार्वजनिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, रुग्णसेवा, स्मशानभूमीत केलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करण्यात आला. लॉकडाऊन आणि कोरोना संकटामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. अशात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू केला जात असतानाच त्याना महसूल वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच करांची वसुली वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले. त्यासोबतच ठाणे महानगरपालिका प्रशासनाला देखील महसूलवाढीसाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याबाबत मंत्री शिेंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर वेतनासंदर्भातील कामगार संघटनेच्या शंकांचे निरसनही यावेळी त्यांनी केले.