सातारा : Satara Nagar Panchayat Election Result 2022 : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना शिवसेनेने (Shiv Sena) जोरदा दे धक्का दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा वचपा काढला आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या (Koregaon Nagar Panchayat) 17 जागांपैकी 13 जागा शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलला आणि 4 जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झाले आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेल विजी झाले असून त्यांनी आपल्या ताब्यात सत्ता खेचून आणली आहे. (Koregaon Nagar Panchayat Shiv Sena wins )
सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे परिवर्तन पॅनलने 14 जागा जिंकत आपली सत्ता आणली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभवाची धूळ चारली आहे.. कोरेगावच्या विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर उचलून घेत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.
राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याशी गद्दारी केली. तसेच या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून आम्हाला बाहेर काढले.आमदार शशिकांत शिंदे हे जावलीचे आमदार असून त्यांनी आता कोरेगावमधून बस्तान उठवावे, असे थेट आव्हान देत शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी टीका केली.
सातारा जिल्हा बँक आणि त्यानंतरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेले राजकारण शांत झाले असले तरी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना शिवसेनेने दे धक्का देत सातारा बँक निवडणुकीची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.