साताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण

Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 28, 2023, 12:13 PM IST
साताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यात (Satara News) भररस्त्यात एका महिलेला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माण तालुक्यातील पानवण येथे गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून भर चौकात चौघांनी महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनी महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Satara Police) दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणई  देवदास नरळे, पिंटू नरळे या दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

आरोपींनी महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचेही व्हायरल व्हिडीओमधून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार होत असताना गावकऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. 

पोलिसांनी काय सांगितले?

"पानवत येथे एका महिलेनं एका व्यक्तीला पैसे दिले होते असं तिचं म्हणणं होतं. ती त्या लोकांकडून पैसे मागत होती. यावरुन त्या लोकांनी महिलेला मारहाण केली. त्यासंदर्भात महिलेनं म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये अॅट्रॉसिटीचे कलम लावून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर दोन आरोपींच्या मागे पोलिसांचे पथक लागले आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.. याप्रकरणी देवदास महादेव तुपे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी देवदास महादेव तुपे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.