'काकडेंच्या भाकीताची कोशिंबीर' झाल्यानंतर ते म्हणाले...

जरातच्या संदर्भात माझं भाकित खोटं ठरलं, असं म्हणता येणार नाही, तर त्या ठिकाणी...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 18, 2017, 05:51 PM IST
'काकडेंच्या भाकीताची कोशिंबीर' झाल्यानंतर ते म्हणाले... title=

पुणे : गुजरातच्या संदर्भात माझं भाकित खोटं ठरलं, असं म्हणता येणार नाही, तर त्या ठिकाणी यश मिळालं, तर तो फक्त मोदींचा करिष्मा असेल, असं मी म्हणालो होतो. त्यामुळे आज गुजरातमध्ये भाजपला जे बहुमत मिळालंय, ते फक्त मोदींमुळेच, असं पुण्याचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. 

वरील फोटो हा भाजपचा गुजरातमध्ये विजय झाल्यानंतर, पुण्यात व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.

काकडे, भाकीत आणि आंधळी कोशिंबीर

गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचं भाकीत काकडे यांनी केलं होतं. गुजरात मधील वातावरण भाजपसाठी नकारात्मक होतं. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला ९०- ९० च्या आसपास जागा मिळतील, असा आपला सर्वे सांगत होता, असं असताना तिथे जे यश मिळालंय, त्यावरून मोदी गांधी नेहरुंपेक्षा मोठे नेते ठरल्याचं सिद्ध झालंय, असं संजय काकडेनी म्हटलं आहे .