नंदूरबार पालिकेत काँग्रेस-शिवसेनेची सत्ता, भाजपचा पराभव

नंदूरबार पालिकेत भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र, भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस - शिवसेना युतीचा विजय झालाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 18, 2017, 04:18 PM IST
नंदूरबार पालिकेत काँग्रेस-शिवसेनेची सत्ता, भाजपचा पराभव title=

नंदूरबार : नंदूरबार पालिकेत भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र, भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस - शिवसेना युतीचा विजय झालाय. 

नंदूरबार पालिकेत ३९ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये काँग्रेस-शिवसेना युतीने  २८ जागा मिळत स्पष्ट बहुमत मिळवलेय. तर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे रत्ना रघुवंशी या विजयी झाल्या आहेत.

नंदूरबारमधून काँग्रेला हद्दपार करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती. मात्र, भाजपला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले.

तळोदात भाजपची सत्ता

दरम्यान, गुजरात राज्याजवळील असलेल्या तळोदा नगरपालिकेवर भाजने सत्ता काबीज केली आहे. या पालिकेत भाजपने ११ जागा तर काँग्रेसने ६ तर शिवसेनेने एका जागेवर विजय संपादन केलाय.

डहाणूत भाजपचे 'कमळ' फुलले 

पालघर : जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषदेत भाजपने सत्ता काबीज केली आहे.  २५ जागांपैकी भाजपने १३ जागांवर विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादीला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, भाजपचे नगराध्य पदाचे उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

डहाणू नगरपरिषद 

१३ जागांचे निकाल जाहीर झाले असून भाजपला १२ जागा राष्ट्रवादी १ जागेवर विजयी झालेय. तर मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार भरत राजपूत ४ हजार ५८३ मतांसह आघाडीवर आहेत.

नवापूर पालिकेत काँग्रेसची बाजी

धुळे : उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता पाटील या विजयी झाल्यात. पाटील या १७३६ मतांनी विजयी झाल्यात.

या ठिकाणी भाजपला एकही जागा मिळालेली नाही. भाजपचा धुव्वा उडाला असून काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादीने ४ जागा पदरात पाडल्यात. शिवसेना आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागावर समाधान मानावे लागले.

पालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा - २० 
काँग्रेस - १४ 
राष्ट्रवादी - ४
शिवसेना- १
अपक्ष - १

वाडा पालिकेत भाजपला दणका

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वाड्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून सेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या असून भाजपाच्या निशा सवरा यांचा त्यांनी पराभव केला आहे. निशा सवरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या कन्या असून सवराना रोखण्यात सेनेला यश आले आहे.तर शिवसेना ६, भाजपा ६ , काँग्रेस २, बहुजन विकास आघाडी २ तर राष्ट्रवादी २ असे पक्षीय बलाबल असून अपक्ष उमेदवारांना मतदारांनी अजिबात स्वीकारले नाही.