सांगली : जिल्ह्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातला एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या नेत्यांशी हा मोठा नेता संपर्कात असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते सत्यजित देशमुखही भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी सांगली जिल्ह्यात आगमन होणार आहे. काँग्रेस नेते सत्यजित देशमुख हे जनसंवाद मेळावा घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याने आजच्या जनसंवाद मेळाव्यातील त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.