LIVE UPDATE सांगली महापालिकेत अखेर भाजपाची सरशी, काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे.

Updated: Aug 3, 2018, 04:08 PM IST

सांगली : (अपडेट 4.05 दुपारी) सांगली महापालिकेवर भाजपने अखेर आपला विजयाचा झेंडा फडकावला आहे, महापालिका निवडणुकीत भाजपचे ३९ उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली महापालिकेत भाजपकडे एक हाती सत्ता आली आहे. भाजपाचा हा विजय फार महत्वाचा मानला जात आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातील एक बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून, पहिल्यांदाच भाजपाला सांगली महापालिकेत सत्ता मिळाली आहे. एवढंच नाही, तर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण जयंत पाटील यांना सांगली महापालिकेत मोठा पराभवाचा सामना करावा लागला.

(अपडेट दुपारी २.४३ ) सांगली महापालिकेचा निकालाचा कल आश्चर्यकारकरित्या बदलला आहे. आता सांगलीत भाजपचे २७ उमेदवार विजय झाले आहेत. तर १३ ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे ८ उमेदवार विजय झाले आहेत, तर एका ठिकाणी १ उमेदवार आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे १० उमेदवार विजय झाले आहेत, तर ४ जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. स्वाभिमानी विकास आघाडी एका ठिकाणी तर, १ अपक्ष निवडून आला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका अपडेट (2.43 दुपारी)

भाजप २९ जागांवर विजयी, ७ जागांवर आघाडीवर = ३६ 
काँग्रेस ८ जागांवर विजयी, २ जागेवर आघाडीवर = १०
राष्ट्रवादी ११ जागांवर विजयी, ३ जागेवर आघाडीवर = १४

स्वाभिमानी विकास आघाडी एका जागेवर आघाडीवर १

अपक्ष १

-----------------------------------------------------------------------

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका अपडेट (2.30 दुपारी)

भाजप २७ जागांवर विजयी, १३ जागांवर आघाडीवर = ४० 
काँग्रेस ८ जागांवर विजयी, १ जागेवर आघाडीवर = ९
राष्ट्रवादी १० जागांवर विजयी, ४ जागेवर आघाडीवर = ११

स्वाभिमानी विकास आघाडी एका जागेवर आघाडीवर १

अपक्ष १

सांगली : (अपडेट सकाळी १०.४५) सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलीच टक्कर दिली आहे. सांगलीत आज ७८ जागांसाठी मतमोजणी होत आहे. यात दुपारी १२ पर्यंत आलेल्या निकालात, भाजप ९ जागी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २२ ठिकाणी आघाडीवर आहे. तर इतर ०२ ठिकाणी आघाडीवर आहेत. सांगलीत निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता, तरी देखील भाजपला पाहिजे तसं यश मिळताना दिसत नाहीय.