जळगाव : महापालिका निकाल अपडेट ( दुपारी १२) जळगावात ५७ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तर सुरेश जैन यांचा जळगावात सुपडा साफ झाला आहे. तुरूंगातून नुकतेच बाहेर आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव म्हणजे सुरेशदादा हे राजकारणातलं समीकरण आता संपुष्टात येण्याच्या दिशेने जात असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने जळगाव मनपात पहिल्यांदा मोठी आघाडी घेतली आहे, ही आघाडी शेवटपर्यंत टिकली तर भाजपसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जाईल. हे निश्चित.य
महापालिका निकाल अपडेट ( ११.४० मिनिटांपर्यंत) भाजप ३०, शिवसेना२२ , काँग्रेस००, राष्ट्रवादी००, इतर ०१ - जळगावात ७५ जागांसाठी मतमोजणी होत आहे, पण सुरेश जैन यांना अजूनही एकही जागा मिळालेली नाही. सुरेश जैन यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, पण शिवसेनेने देखील भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे. एका जागी एमआयएमचा उमेदवार आघाडीवर आहे, तर भाजपचे चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता चंद्रकांत सोनवणे या विजयी झाल्या आहेत.