संभाजीराजे यांचा मोठा निर्णय, 'त्यांनी केव्हाही हाक द्यावी मी त्यांच्या सेवेत'

Sambhaji Raje on Rajya Sabha elections :संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असे ते म्हणाले.

Updated: May 27, 2022, 03:36 PM IST
संभाजीराजे यांचा मोठा निर्णय, 'त्यांनी केव्हाही हाक द्यावी मी त्यांच्या सेवेत' title=

मुंबई : Sambhaji Raje on Rajya Sabha elections :संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. पण ही माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असे संभाजीराजे  यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी ते म्हणाले, ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहीन. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. 

शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करा. तुम्हाला खासदारकी मिळेल. त्यांची ऑफर मी घेऊ शकलो असतो, पण मी जाहीर केले होते की, मी कोणत्याची पक्षात जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत. राजे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडेबाजार होणार त्यामुळे मी उमेदवारी भरणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केलं आहे

माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. पुण्यातील पत्रकारांनी पीसी ऐकल्यावर मला विचारले हा भाभडेपणा नाही का? मी म्हटलं हो. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पाहायचं होते. सर्व अनुभवायचं होते. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असे वाटत होते, असे संभाजीराजेंनी म्हटले.