संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज सुनावणी

 'लेक लाडकी अभियान'तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती

Updated: Aug 10, 2018, 11:45 AM IST
संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज सुनावणी  title=

नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. नाशिकमध्ये १० जूनला झालेल्या सभेत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी भिडे यांच्याविरोधात 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याशिवाय नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनाही तक्रार देण्यात आली होती. 

तक्रारीची दखल घेत नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीवेळी भिडे उपस्थित न राहिल्याने महापालिकेने त्यांच्याविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.