रायगड : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. भारतातील 12 हजाराहून अधिक लोकं सध्या युक्रेनमध्ये असून त्यातील 1200 हून अधिक हे विद्यार्थी आहेत जे शिकण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. (Russia-ukrain war 22 students from Raigad district stuck in ukraine)
भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनास विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील शिक्षणासाठी गेलेले 22 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना आता मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रयत्न करीत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ही माहिती दिली.