भिंत फोडायला गेला आणि आयुष्यातून उठला; पुण्यात प्लंबरसह घडली भयानक घटना

पुण्यातील वारजे भागात प्लंबिंगचे काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू  झाला. दयानंद बनसोडे (39) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजित बनसोडे यांनी या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Updated: Dec 4, 2022, 07:05 PM IST
भिंत फोडायला गेला आणि आयुष्यातून उठला; पुण्यात प्लंबरसह घडली भयानक घटना title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : प्लंबिंगचे(plumbing) काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला आहे. पुण्यात(Pune) ही दुर्घटना घडली आहे. कामगार भिंत फोडत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे एकच खबळबळ उाडली असून कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. 

पुण्यातील वारजे भागात प्लंबिंगचे काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू  झाला. दयानंद बनसोडे (39) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजित बनसोडे यांनी या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे वारजे भागातील एका सोसायटी मध्ये प्लंबिंगचे चे काम करत होते. सोसायटी मधील एका फ्लॅटच्या भिंत फोडायचे काम सुरू असताना त्यांना अचानक शॉक लागला. त्यावेळी त्यांच्या बरोबर आणखी एक सहकारी उपस्थित होता. 

बनसोडे यांच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बनसोडे यांनी त्यांच्या ठेकेदाराने प्लंबिंगचे काम करत असताना सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले गमबुट, हॅण्ड ग्लोज यासह दुसरे कुठले ही साहित्य दिले नव्हते.

भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०४ नुसार ठेकेदार विनीत गाडगीळ यांच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.