खडकवासला धरण फुटल्याची निव्वळ अफवा

पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली

Updated: Aug 6, 2019, 02:31 PM IST
खडकवासला धरण फुटल्याची निव्वळ अफवा title=

पुणे : पुणे शहर आणि परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. त्यातच खडकवासला धरणाला तडा गेल्याची आणि धरण फुटल्याची अफवा काल पुण्यात पसरली होती. मात्र यात तथ्य नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. खडकवासला धरणाला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पुणेकरांनो, अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका.

याआधी देखील अनेकदा अशा अफवा पसरवण्यात आल्या आहेत. अशा अफवा पसरवून चोरांनी अनेक ठिकाणी हात साफ केल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.