तिकोणा किल्ल्यावर लोकवर्गणीतून उभा राहिला 'रोप वे'

रोप-वे चालू केल्यानंतर त्यातून अर्धे पोते कच आणि खडी टाकून ट्रॉली गडाच्या दिशेने चालू लागली

Updated: May 8, 2018, 11:01 PM IST
तिकोणा किल्ल्यावर लोकवर्गणीतून उभा राहिला 'रोप वे'  title=

पुणे : मावळ भागातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनासाठीचे साहित्य पोहचवण्यासाठी मालवाहतूक रोप वे उभारण्यात आलाय. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनव्यतिरिक्त लोकवर्गणीतून हा रोप वे उभारण्यात आलाय. या रोप वेचे अंतर चारशे मीटर असून तो साडे तीनशे किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था आणि शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले तिकोणा गडावर साहित्य गडावर पोहचवण्यासाठी हा रोप वे उभारण्यात आलाय.

किल्ले तिकोणा गडावर छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी रोप-वेला हार फुलांनी सजवण्यात आलं होतं. रोप-वे चालू केल्यानंतर त्यातून अर्धे पोते कच आणि खडी टाकून ट्रॉली गडाच्या दिशेने चालू लागली.