पुण्यात एकाच वेळी २ हजार २५३ जणांचा योगा करत विक्रम

 शिल्पा शेट्टी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी

Updated: Nov 25, 2018, 05:55 PM IST
पुण्यात एकाच वेळी २ हजार २५३ जणांचा योगा करत विक्रम title=

पुणे : पुण्यात एकाच वेळी २ हजार २५३ जणांनी अॅब्डॉमिनल प्लँक हा योग प्रकार करुन नवीन विक्रम नोंदवला. प्रसिद्ध अभिनेत्री आणि फीटनेस प्रेमी शिल्पा शेट्टी या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होती. तिनंही या विश्वविक्रमात सहभाग घेतला. शिल्पा शेट्टीसह २ हजार २५३ लोकांनी एक मिनिट अॅब्डॉमिनल प्लँक हा योग प्रकार करुन त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.

प्लँकेथॉन असं या उपक्रमाचं नाव होतं.उत्तम आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्यातील एएफएमसी ग्राउंड येथे हा नवा जागतिक विक्रम रचण्यात आला.