कोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरीत कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल.

Updated: Mar 7, 2020, 09:39 AM IST
कोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल title=
Pic Courtesy: Reuters photo

मुंबई : रत्नागिरीत कोरोना विषाणूच्या एका संशयित रुग्णाला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणीही घाबरुन जावू नये. केवळ लक्षणे आढळल्याने  खबरदारी म्हणून या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेला संशयित रुग्ण हा दिल्ली येथे गेला होता. त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. घशाला सूज आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, जगभरात आणि देशात आज कोरोनाच सावट आहे. देशात २९ रुग्ण सापडलेत. साज्यात संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी गर्दी टाळता आली तर टाळावी, मोठे कार्यक्रम टाळावे, असे सगळ्यांना आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मास्क वापरण्याची तशी गरज नाही. खोकला - शिंक ड्रॉपलेटसमधूनच कोरोनाचा पसार होतो. त्यामुळे काळजी घ्या. वारंवार हात धुवावे हाच कोरोनावर उपाय आहे. लोकांना जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात जे मास्क आणि सॅनेटायझर काळाबाजार करताय त्यांचेवर कारवाई करावा लागेल. सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे त्यांचेवर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. जे मास्कचा साठा करत आहे त्यांना आज समज देतोय, पुढील काळात कारवाई करू, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

काळाबाजार रोखण्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत,  हे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ‘एन ९५ मास्क’सह एकदा वापरून फेकण्याचे ‘मास्क’ही दुप्पट किमतीने विकण्याचे प्रकार घडत आहेत, याबाबत खबरदारीही घेतल्याची माहिती टोपे यांनी दिली.