तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद पाहा कोण खातंय? मंदिरातील CCTV फुटेज व्हायरल

तुळजाभवानी देवीच्या मंदीरात उंदरांचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. मूख्य गाभाऱ्यात उंदराचा वावर कॅमेरात कैद. उंदराच्या कुरतडण्यानं शॉर्टसर्कीटमुळे आगीची भीती व्यक्त केली जात आहे. 

Updated: Jun 14, 2023, 05:59 PM IST
तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद पाहा कोण खातंय? मंदिरातील CCTV फुटेज व्हायरल  title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते. भाविक मोठ्या श्रद्धेने  पेढे,साखर,लाडु अन्य गोड पदार्थ तुळजाभवानीला प्रसाद म्हणून अर्पण करतात. तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद पाहा कोण खातंय याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मंदिरातील हे CCTV फुटेज आहे. या CCTV फुटेजमधील दृष्य पाहून भाविक संतापले आहेत. 

काय आहे व्हिडिओत? 

तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद चक्क उंदीदत खात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  तुळजाभवानी मंदीरात उंदरांचा सुळसुळाट झााला आहे. देवीच्या मूख्य गाभाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणावर उंदराचा वावर पाहायला मिळत आहे. देवीच्या मंदीरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडित उंदीर देवीच्या मूर्तीभोवती फिरत आहेत. तसेच, मूर्तीवर देखील चढत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

उंदीर पकडण्यासाठी गाभाऱ्यात पिंजरा

या उंदरांच्या उपद्रवामुळे मंदीर संस्थानच्या वतीने उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. उंदीर पकडण्यासाठी गाभाऱ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. या उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंदीर प्रशासनाने दिली आहे. याविषयी मात्र मंदिर संस्थांचा कोणताही अधिकारी कॅमेरा समोर बोलायला तयार नाही. मंदीरात 24 तास नंदादीप तेवत असतो. तसेच  CCTV कॅमेऱ्यासह दिवे सुरु असतात. त्यामुळे उंदरांनी वायर कुरतडल्यास शॉर्ट सर्कीटसह अन्य प्रकार घडु नये यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुजारी करत आहे.

आई तुळजाभवानी चरणी 354 हिरे

आई तुळजाभवानी चरणी भक्तांनी लाखो रुपये किमतीचे 354 हिरे अर्पण केले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या सोने, चांदी, हिरे अशा मौल्यवान वस्तूची मोजणी सुरू आहे. आणखी जवळपास 25 दिवस मोजणी सुरू राहणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आई तुळजाभवानी चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूची मोजणी झालेली नव्हती. गेल्या बुधवारपासून या मोजणीला सुरुवात झालीय. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात देशभरातील भक्तांनी आई तुळजाभवानीच्या चरणी किती दान केलंय, ही माहिती आता उघड होणारेय.