पवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे

भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला जातीयवादी म्हणाऱ्यांनी आपमच्या पंगतीत जेवून गेला आहात.  

Updated: Mar 1, 2019, 08:07 PM IST
पवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे title=

जालना : भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला जातीयवादी म्हणाऱ्यांनी आपमच्या पंगतीत जेवून गेला आहात. तुमची खरकटी तोंडे अजूनही आम्हीला दिसत आहेत. आमच्यासोबत सत्तेत होतात, त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीयवादी वाटलो नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तुम्ही एकत्र आलात आहात, पण तसे काहीही होणार नाही. सत्ता आमचीच येणार आहे. सत्तेसाठी तुम्ही आमच्या पंगतीत येतात. मात्र, ज्यावेळी जमत नाही त्यावेळी तुम्ही पांगता. त्यामुळे हे विरोधक आम्हाला कितीही जातीयवादी म्हणत असले तरी आमच्या पंगतीत जेवून गेलात, हे लक्षात ठेवा, अशी बोचरी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

दानवे यांनी घेतले तोंडसुख

पवारांसह विरोधक आमच्या पंगती जेवलेत, त्यांची खरकटी तोंडे दिसत आहेत - दानवे

रावसाहेब दानवे यांची शरद पवारांसह विरोधकांवर जोरदार टीका. आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मायावती, फारूक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्वच नेते एकत्र आलेत. मात्र कधीकाळी यातील नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये भाजपचे उत्तमराव पाटील महसूल मंत्री होते. त्यामुळे विरोधकांचे भाजपसोबत जमते तेव्हा यांच्यासाठी आम्ही जातीयवादी नसतो. यांचे जेव्हा पांगते तेव्हा हेच विरोधक आम्हाला जातीयवादी म्हणतात. त्यामुळे या विरोधक विरोधकांनी आम्हाला काहीही शिकवू नये, असे तोंडसुख दानवे यांनी घेतली.

 ''युतीचा जयघोष करा, ...तरंच मोदी पंतप्रधान होतील''

आज जालना शहरात 'आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या' ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दानवे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.'सगळेच लोक म्हणतायत मला जालना लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायचे, मग निवडणूक घ्यायचीच कशाला ? असे म्हणत मला निवडून दिल्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आधी स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजप शिवसेनेची युती झाली आहे. मात्र कार्यकर्ते अजूनही आपापल्या पक्षाच्याच विजयाच्या घोषणा देताना दिसत आहे. या कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फक्त भाजप विजयाच्या घोषणा दिल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भाजप-शिवसेना युतीचा विजय, असो अशा घोषणा द्या, असा सल्ला उपस्थितांना दिल्याने जोरदार हशा पिकला.