मुंबई : भाजप सरकारच्या धोरणांवर अनेक दिवसांपासून नाराज असलेले आणि वेळोवेळी भाजप सरकारवर टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसमधून आले आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार ही त्यांची जुनी सवय असून मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठीचा त्यांचा हा राजीनामा फंडा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. शेतक-यांची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेलं हे कारस्थान असल्याची टीकाही त्यांनी केली. याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांना भाजपात घेणार नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
केंद्र सरकार दबाव आणून लोकांचे गळे दाबतंय, मोदींची भूमिका ही लोकशाहीची नाही, असा घणाघात करत अखेर भाजप खासदार नाना पटोलेंनी राजीनामा दिलाय. केंद्र आणि राज्य सरकराच्या कृषी धोरणांवर सातत्यानं टीका केल्यावर आज अखेर पटोलेंनी लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला. अनेकदा तक्रारीचा सूर नोंदवूनही भाजपच्या नेतृत्वानं पटोलेंकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
शेतक-यांचे कीटकनाशक मृत्यू प्रकरणी सरकार कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. चारच महिन्यात हा साठा संपुष्टात येईल. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती पालिकेनं सरकारकडे केलीय.