राणा - शिवसेना राडा : राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा, पाहा कोण काय म्हणाले?

 ​High drama at Matoshree as Navneet Rana decides to recite Hanuman Chalisa : राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्यामुळे शिवसैनिक आणखीनच आक्रमक झालेत. दरम्यान कायदा सुवव्यवस्था बिघडू नये म्हणून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Updated: Apr 23, 2022, 01:08 PM IST
राणा - शिवसेना राडा : राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा, पाहा कोण काय म्हणाले? title=

मुंबई :  High drama at Matoshree as Navneet Rana decides to recite Hanuman Chalisa : राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्यामुळे शिवसैनिक आणखीनच आक्रमक झालेत. दरम्यान कायदा सुवव्यवस्था बिघडू नये म्हणून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असे कुणाला वाटत असेल तर त्यात गैर काय, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका, असा इशारा देताना राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम राणा दाम्पत्याकडून सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. 
 
राज्यातील वातावरण मुद्दाम खराब करत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. राज्सात अस्थिर वातावरण करण्याचा डाव आहे. राज्यात सर्व ठीक आहे, पण भाजप राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण मुद्दाम केले जात आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे, गोंधळ वातावरण मुद्दाम निर्माण केले जात आहे, असे थोरात म्हणाले. (High drama at Matoshree as Navneet Rana decides to recite Hanuman Chalisa outside Uddhav's house)

शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे एक ट्वीट करत शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचं म्हटले आहे. (Sandeep Deshpande)शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे, एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे, असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी रात्रभर खडा पहारा दिला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच शिवसैनिक तिथं जमले आणि त्यांनी भजन-कीर्तन सुरू केले. इमारतीबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलं. त्याच्या बाहेरच्या बाजूला शिवसैनिक जमलेत. 

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्यास राणा दाम्पत्य ठाम आहे. शिवसैनिकांना एवढी सूट कशी मिळाली असा सवाल नवनीत राणांनी उपस्थीत केलाय. तर पोलीसांना हाताशी धरुन मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत असा आरोप आमदार रवी राणांनी उपस्थीत केलाय. गृहमंत्र्यांनी परिस्थिती बिघवडत असल्याचा आरोप केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री सुव्यवस्था बिघडवत असल्याची प्रतिक्रिया 'झी 24 तास'कडे दिली. आम्हाला खाली सोडा, कुणाची किती ताकद आहे पाहुया असंही राणा म्हणाल्या.  

राणा दाम्पत्य वेळ देऊनही अद्याप घराबाहेर पडलेलं नाही मात्र राणा दाम्पत्यांने जी वेळ दिली होती त्या वेळेला म्हणजेच सकाळी नऊ वाजता शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराखाली लावलेले बॅरिकेट्स ढकलले. काहींनी बॅरिकेट्सवर चढून जाण्याचा प्रयत्न केला तर काहीं महिला शिवसैनिकांनीही चक्क बॅरिकेट्स खाली पाडले. राणा दाम्पत्याने खाली उतरून दाखवावं असा धमकी वजा इशारा शिवसैनिकांनी दिला.