'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.

Updated: Aug 13, 2017, 07:32 PM IST
'शरद पवार भाजपसोबत आले तर...' title=

सांगली : शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत, असंही आठवले म्हणालेत.

भाजप आणि शिवसेनेनं आपापसातले वाद थांबवावेत. मात्र शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तरी, आपण राज्य सरकार पडू देणार नाही. 15 आमदारांची जबाबदारी आपल्यावर सोपवावी. ती आपण पार पाडू असं मत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडलं आहे.