राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

बाबासाहेबांसोबतच्या गोड आठवणी यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितल्या.

Updated: Aug 14, 2021, 03:00 PM IST
राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट  title=

मुंबई : शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. बाबासाहेबांनी शतक गाठलं आहे. याचनिमित्ताने पुण्यात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गज कलाकार आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.

बाबासाहेबांसोबतच्या गोड आठवणी यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितल्या. गायिका आशाताई भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार सह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बाबासाहेबांचं सुवासिनींच्या हस्ते 99 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं.आशा भोसले यांच्या हस्ते बाबासाहेबांचा सत्कार होत आहे.

ओंजळ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे बाबासाहेबांसाठी अनोखी भेट राज ठाकरे घेऊन आले होते.

ही भेट खरंतर त्यांच्या मित्राने तयार केली होती. राज ठाकरे यांच्या सांगण्यावरुन चित्रकार विजय राऊत यांनी बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं. जे त्यांना व्यासपीठावर देण्यात आलं.