माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा

Maharashtra Politictics : राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाही. राज यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थेट इशारा दिला आहे.

वनिता कांबळे | Updated: Aug 10, 2024, 08:46 PM IST
माझ्या नादाला लागू नका... सुपारी फेक आंदोलनानंनतर  राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा  title=

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : मराठवाडवाडा दौऱ्यात वारंवार आंदोलनांना सामोरे जावं लागल्यानं संतापलेल्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाआडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय... ताफ्यासमोरच्या घोषणाबाजीला आणि आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.. माझ्या वाट्याला जावू नका, माझं मोहोळ उठलं तर राज्यात सभासुद्धा घेता येणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय..

'माझ्या नादाला लागू नका'

तर बीडमध्ये राज ठाकरेंविरोधात सुपारी फेक आंदोलन आमच्या पक्षाचं नव्हतं... कार्यकर्ते आमच्या पक्षाचे असतील, मात्र सुपारी फेकण्याची भूमिका पक्षाची नव्हती अशी माहिती संजय राऊतांनी दिलीय... तर ही शिवसेना हिजबुल्लाची विचार करणारी आहे... सुरूवात तुम्ही केली शेवट आम्ही करु असं प्रतिआव्हान संदीप देशपांडेंनी दिलंय.

'आताची शिवसेना हिजबुल्ला विचाराची'

दुसरीकडे राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यात आंदोलन नाही, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलंय... वेळ आली तर मुंबईत जाऊन गचांडी धरून जाब विचारू, असा गर्भित इशाराच जरांगेंनी दिलाय... तर जरांगे पाटलांना भेटून बोलू, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलंय.

...तर मुंबईत जाऊन गचांडी धरू'

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. आता राज यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट इशारा देत करारा जवाब मिलेगा हेच सांगितल्याचा पाहायला मिळतंय.
राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यात आंदोलन नाही, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलंय. वेळ आली तर मुंबईत जाऊन गचांडी धरून जाब विचारू, असा गर्भित इशाराच जरांगेंनी दिलाय... तर जरांगे पाटलांना भेटून बोलू, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम करणार...असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय...लातूरमध्ये भाषणादरम्यान त्यांनी हा आरोप केलाय...त्याचबरोबर मनोज जरांगे आमचा कार्यकर्ता असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाल्याचा गौप्यस्फोटही नाना पटोलेंनी केलाय...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडलीये...सातारा दौ-यावर असलेल्या जरांगेंनी तब्बल तासभर भाषण केल्यानंतर ते अचानक स्टेजवर बसले...त्यानंतर त्यांचा हातत थरथर कापत होता...त्यांना तात्काळ प्रीती एक्झिक्युटीव्ह या हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना तपासलं...जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून  डीहायड्रेशनमुळे त्यांना हा त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि जरांगेंना विश्रांती घ्यायला लावलीये...