Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Updated: Mar 7, 2023, 11:15 AM IST
Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता title=
Maharashtra Rain Weather Updates

Maharashtra Weather Updates:  मुंबईत काही भागात पावसाला (Rain ) सुरुवात झाली आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबईतही सकाळपासून पाऊस पडत आहे. ( Weather Updates ) मुंबईच्या दक्षिण भागात दादर, परेलमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात अनेक भागात आजही अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही सध्या पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हवेच्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पाऊस होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. 9 मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 

नाशिक विभागात अवकाळी पावसाचा कहर (Weather Update In Nashik )

नाशिकमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. एकूण 6 हजार 78 हेक्टरवर नुकसान झाले आहे. तर  धुळे जिल्ह्यात सर्वाधिक 3 हजार 144 हेक्टरवर नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यातल्या निफाडला सर्वाधिक फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या धुळवडीनं बळीराजाच्या डोळ्यात पाणी  आला आहे. तर अवकाळी पावसानं पुण्याच्या शिरुरमध्ये मोठं नुकसान केले आहे. रात्रभर वादळी वा-यासह अवकाळी पावसानं शिरुरुला झोडपले आहे. मक्याचं उभं पीक जमीनदोस्त झालं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा हतबल झाला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुळ्यात धुमाकूळ घातलाय. धुळे जिल्ह्यातल्या तुफान गारपिटीमुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसलाय. सर्वाधिक नुकसान धुळे जिल्ह्यात झाले आगे. जवळपास 3 हजार 144 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जळगावात मोठं नुकसान झालंय. रावेर, यावल, भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसलाय. ऐन ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. पालकमंत्री गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुळे जिल्ह्याला झोडपलंय.. शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी गिरीश महाजन करणार आहेत. उभं पिक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदील झालाय... तेव्हा पालकमंत्री कोणती घोषणा करताय याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा (Heatwave in Maharashtra)

बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश पंतप्रधान  मोदी यांनी दिले आहेत. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली.. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. मान्सूनचा अंदाज, अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवर होणारा परिणाम, आरोग्य व्यवस्थेची तयारी, उष्णतेसंदर्भात आपत्ती आणि अग्निशमन उपायांची तयारी याची सर्व माहिती पंतप्रधानांनी घेतली. समजण्यासाठी सोपा दैनंदिन हवामान अंदाज तयार करण्याची सूचना मोदींनी दिली. तर प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये धान्याची साठवण करण्याची तयारी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली.