राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबईसह अनेक भागात पावसाची शक्यता

Updated: Sep 20, 2018, 04:02 PM IST
राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता title=

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरात तापमान कमी झाल्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटलं की, गुजरातच्या किनाऱ्यावर चक्रवादळाचा दबाव निर्माण झाल्याने महाराष्ट्रात ढग तयार होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात देखील मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.