रायगडमधील महिला बचत गटांचा LED बल्ब निर्मितीचा अनोखा उपक्रम

महिला बचत गट म्हंटलं की डोळयासमोर येतात लोणची, पापड किंवा साडया विकण्याचा व्यवसाय... मात्र, आता महिला बचतगट ही कात टाकायला लागलंय. रायगड जिल्ह्यातील महागावमधल्या एका महिला बचतगटाने चाकोरी बाहेर जावून काम केलंय. पाहुया या महिलांनी नेमकं काय केलयं?

प्रफुल्ल पवार | Updated: Apr 15, 2018, 07:11 PM IST
रायगडमधील महिला बचत गटांचा LED बल्ब निर्मितीचा अनोखा उपक्रम title=

प्रफुल्ल पवार, झी मिडिया रायगड : महिला बचत गट म्हंटलं की डोळयासमोर येतात लोणची, पापड किंवा साडया विकण्याचा व्यवसाय... मात्र, आता महिला बचतगट ही कात टाकायला लागलंय. रायगड जिल्ह्यातील महागावमधल्या एका महिला बचतगटाने चाकोरी बाहेर जावून काम केलंय. पाहुया या महिलांनी नेमकं काय केलयं?

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

रायगड जिल्ह्याच्या दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील हे महागाव. एकेकाळी वायरला साधी पिनही जोडू न शकणाऱ्या या महिला आज अगदी सफाईदारपणे तांत्रिक काम करताना दिसतात. सर्किटचं सोल्डरिंग, बल्बच्या कॅपचे पंचिंग, सर्किटमध्ये कॅपॅसिटर्स जोडणं आणि अवघ्या ७ ते ८ मिनीटांत एलईडी बल्ब्स तयार करणं हा आता त्यांच्या एका हाताचा खेळ झालाय.

देशभरातील एलईडी दिव्यांची मागणी लक्षात घेता या महिलांनी दिवे बनवण्याचा व्यवसाय निवडला. आव्हानात्मक वाटणारं हे काम या महिलांनी पेललं आणि अवघ्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्या कामात चांगल्याच तरबेज झाल्या.

साधारण २० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचे विविध क्षमतेचे आणि प्रकारांचे एलईडी दिवे इथे तयार होतात. त्यामुळे महिलांना गावातच रोजगार उपलब्ध झालाय.  या शिवाय भविष्यात सोलर पॅनल आणि कुलर निर्मितीचंही प्रशिक्षणही या महिलांना दिलं जाणार आहे.

पारंपारीक चौकट मोडून या महिलांनी चोखाळलेली वेगळी वाट गावाला अंधारलेल्या मार्गावर विकासाचा प्रकाश दाखवेल हे निश्चित.

रायगड । महिला बचत गटांचा मोठा उपक्रम, एलईडी बल्ब निर्मिती