वर्धा : येथे आलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया आणि विद्यामान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी स्वतःची ताटे स्वतः घासून ठेवली. सेवाग्राम आश्रम परिसरात नई तालीम येथे भोजन घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ची ताटे आणि वाट्या स्वत: विसळून ठेवल्या.
दृढ़ संकल्प से ही विपरीत परिस्थितियों से लड़ने की ताकत आती है और वर्तमान समय संकल्प का है। सु-शासन को कमजोर कर रही षड़यंत्रकारी ताकतों से 'गाँधी पथ' पर चलकर ही लड़ा जा सकता है। pic.twitter.com/3WwHC3ZqRb
— Congress (@INCIndia) October 1, 2018
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यात आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात दुपारचं भोजन घेतले. यानंतर त्यांनी स्वत:च ताट स्वत:चे धुतले. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनीदेखील स्वत:ची ताटे धुतली. महात्मा गांधी यांनी स्वावलंबनाची शिकवण दिली होती. ती आज काँग्रेस अध्यक्षांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आचरणात आणल्याचे दिसून आले.
#WATCH: Sonia Gandhi and Rahul Gandhi wash their plates after lunch in Sevagram (Bapu Kuti) in Wardha. #Maharashtra pic.twitter.com/hzC3AGe7kj
— ANI (@ANI) October 2, 2018
यावेळी सेवाग्राम आश्रमात राहुल गांधींनी काही स्थानिकांशी संवाद साधला. यानंतर राहुल गांधी एका जनसभेला संबोधित केले.
महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राममध्ये काँग्रेस पक्षाची बैठक होत असल्याने ती अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असेल. विशेष म्हणजे तब्बल 70 वर्षांनंतर सेवाग्राम आश्रमात काँग्रेसची बैठक होत आहे.
LIVE: Congress President @RahulGandhi addresses the #GandhiSankalpRally in Wardha https://t.co/B64MlcOQSg
— Congress (@INCIndia) October 2, 2018