भाजपला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा

भाजपच्या आमदारकीचा राजीनामा

Updated: Oct 2, 2018, 02:41 PM IST
भाजपला मोठा धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा title=

नागपूर : भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. ईमेल आणि फॅक्सद्वारे त्यांनी हा राजीनामा पाठवला आहे. आशिष देशमुख नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आहेत.

काँग्रेसमध्ये जाणार?

आशिष देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्य़ाचं देखील बोललं जात आहेत. वर्धा येथे राहुल गांधींची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. वर्ध्याला होणाऱ्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला आशिष देशमुख हजेरी लावणार आहेत.

भाजपला दुसरा धक्का

विदर्भातील नाना पटोले यांच्यानंतर आशिष देशमुखही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख नाराज होते. वेगळ्या विदर्भासाठी ते आग्रही होते. वेगळ्या विदर्भासाठी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज होते.