Love Date aur Dhoka... दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर समोर

Darshana Pawar Murder Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगलं यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला होता. राहुल हांडोरे नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 22, 2023, 11:55 AM IST
Love Date aur Dhoka... दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर समोर title=

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार (Darshana Pawar) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतून राहुल हांडोरे (Rahul Handore) नावाच्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाला नकार दिल्याने राहुल हंडोरेनेही दर्शना पवारची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 18 जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दर्शनाचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना तिचा संशयास्पद वाटत होता. अखेर पोलिसांनी याप्रकरणात राहुल हांडोरेला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली होती. दर्शना आणि राहुल हांडोरे राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. त्याचवेळी राहुल हांडोरेने दर्शनाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर राहुल हांडोरे पसार झाला होता. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी हांडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

एमपीएससी परीक्षेत दर्शना पवार राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी दर्शना पुण्याला आली होती. त्यावेळी ती एका मैत्रिणीकडे थांबली होती. त्यानंतर 12 जून रोजी राजगड किल्ल्यावर जात असल्याचे दर्शनाने कुटुंबिय आणि मैत्रिणींना सांगितले होते. त्यावेळी तिच्यासोबत राहुल हांडोरे देखील होता. मात्र तेव्हापासूनच तिचा मोबाईल बंद झाला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दर्शनाचा शोध न लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला.

राहुल हांडोरे कोण आहे?

राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाह गावाचा रहिवासी आहे. राहुलने बी.एस.सी. पर्यंतचंचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचदरम्यान राहुल आणि कोपरगावच्या दर्शनाची ओळख झाली. तपासामध्ये दोघेही नातेवाईक असल्याचेही समोर आले. पुण्यात आल्यानंतर दर्शना राहुलसोबत राजगडला ट्रेकिंगसाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली.

दर्शनाच्या हत्येचे कारण समोर

दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. दर्शना आता फक्त अधिकारी बनण्याची औपचारिकताच उरली होती. मात्र दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे राहुल हांडोरे अस्वस्थ होता. त्याने मला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, मी देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले.  मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.