'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते.   

शिवराज यादव | Updated: Mar 16, 2024, 12:25 PM IST
'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप title=

Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळी वाजवा, फोनची फ्लॅशलाइट लावा सांगत होते. तुम्ही थाळी वाजवत असताना पूनावाला तुमच्या खिशातून पैसे काढत भाजपाला देत आहेत असं राहुल गांधी म्हणाले आहेत. करोनात तुमचे पैसे चोरले असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर जांभळी नाका येथेच लोकांना संबोधित केलं. 

'अदर पूनावाला यांनी मोदींना पैसे दिले'

"करोनात किमान 50 लाख लोकांचा मृत्यू झाला. करोनामध्ये भारतात मृतदेहांचे खच पडत असताना लस बनवणारी कंपनी नरेंद्र मोदींना पैसे देत होती. एकीकडे मृतदेह आणि दुसरीकडे लस बनवणारी कंपनी सिरम इन्सिट्यूट थेट नरेंद्र मोदींच्या पक्षाला करोडो रुपये देत होती. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळी वाजवा, फोनची फ्लॅशलाइट लावा सांगत होते. तुम्ही थाळी वाजवत असताना पूनावाला तुमच्या खिशातून पैसे काढत भाजपाला देत होते. करोनात तुमचे पैसे चोरले," असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  

पुढे ते म्हणाले की, "कंपन्यांच्या याद्या बाहेर आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हफ्ता सुरु आहे. जो आवाज उठवतो त्यांना अमित शाह धमकावत जेलमध्ये टाकून देतात. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये फूट कशी पाडली? आमदार जे पळाले आहेत ते फुकटात पळाले असं वाटतं का? या सर्वांना नरेंद्र मोदींच्या सरकारने फीट केलं आहे. इलेक्टोरल बाँडमधून हफ्ता घेतात आणि महाराष्ट्र. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश येथील सरकार पाडतात. अमित शाह, मोदी आणि अदानी सरकार पाडण्यासाठी उभे राहतात". 

"इलेक्टोरल बाँडचा ढाचा तयार केला. भारतातल्या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपये मोदी पार्टीला देतात. ईडी,सीबीआय त्या कंपन्यांवर लावतात. दोन तीन महिन्यानंतर भलं मोठं डोनेशन देतात मग त्यानंतर ईडीची कारवाई थांबतात.  त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात. जी कंपनी पैसे देते त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात. मग सीबीआय चौकशी बंद होते," असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

 

"राम मंदिराच्या कार्यक्रमात तुम्हाला गरीब, मजूर, शेतकरी दिसला का? पण उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी सगळे दिसले. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यांनाही प्रवेश दिला नाही. तुम्ही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येऊ शकत नाही. तुमच्यासाठी येथे जागा नाही असं त्यांना सांगण्यात आलं. झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही येऊ दिलं नाही. हा कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेले 1 टक्के लोक जाऊ शकतात असं सांगण्यात आलं," असा दावा राहुल गांधींनी केला आहे. 

"4 लोक आल्यानंतर तिघांना लाथ घालून बाहेर काढू असं अग्निवीरांना सांगण्यात आलं. त्यांना फक्त 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. चीनच्या जवानाला 5 वर्षं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना समोरासमोर आणलं तर 6 महिन्याचा आहे त्याचा मृत्यू होईल. जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा लष्कर त्यांना तुम्ही अग्निवीर आहात, मृतदेह घेऊन जा असं कुटुंबाला सांगितलं जाईल. त्याला शहीदाचा दर्जा, पेंशन दिलं जाणार नाही. फक्त 1 टक्क्याला लष्कराच्या सर्व सुविधा मिळतील," असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.