आर आर पाटील यांची कन्या स्मिता होणार पुण्याची सून

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची ज्येष्ठ कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील या लवकरच विवाह बंधनात अडणार आहेत. त्या पुण्याची सून होणार आहेत. 

Updated: Nov 17, 2017, 06:46 PM IST
आर आर पाटील यांची कन्या स्मिता होणार पुण्याची सून title=

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची ज्येष्ठ कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील या लवकरच विवाह बंधनात अडणार आहेत. त्या पुण्याची सून होणार आहेत. 

दौंडचे व्यावसायिक थोरात

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचा विवाह ठरलाय.

साखरपुडा पुढील महिन्यात

पुढील महिन्यात अर्थात ९ डिसेंबरला स्मिता पाटील आणि आनंद थोरात यांचा साखरपुडा होणार आहे. तर मे २०१८ मध्ये त्यांचे लग्न होणार आहे. 

शरद पवार यांचा पुढाकार!

आनंद थोरात यांनी आपले शिक्षण परदेशात घेतले आहे. सध्या ते पुण्यात त्यांचा व्यावसाय सांभाळत आहेत. या विवाहासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.