सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांना दिली उत्तरांच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा अनेकदा सावळा गोंधळ समोर येतोय

Updated: Aug 2, 2022, 02:49 PM IST
सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांना दिली उत्तरांच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका title=

अहमद शेख, सोलापूर : सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा अनेकदा सावळा गोंधळ समोर येतोय. सोलापूर विद्यापीठाची अशी कोणतीही परीक्षा नाही की त्यात काही गोंधळ झाला नाही. असाच गोंधळ आता पुन्हा एकदा समोर आलाय. विद्यापीठाने चक्क उत्तरांना खुणा केलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांच्या हातात सोपवल्या.

विद्यापीठाच्या अधिविभागात एमए उर्दूसाठी 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका विद्यापीठाने दिली. विशेष म्हणजे म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला खुणा केलेल्या होत्या. 

 हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर चौकशी करू अशी उत्तरे विद्यापीठ प्रशासनाने दिली. संबधित प्रकाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
 
सुरुवातीला परीक्षा पद्धतीबाबत विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला. त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली.

विद्यापीठाने हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर वायरल झाली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर संबधीत प्रकरणाची  विद्यापीठाने चौकशी करण्याचे आदेश दिले.