Pune Crime News in Marathi : पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजले जाते. मात्र त्याच पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. पुणे शहराची राज्यातच नाहीतर देशात सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. मात्र पुणे शहरामधील सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील वातावरण हे भयभीत झालं आहे. परिणामी अनेकदा यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
दरम्यान पुण्यात पैशांसाठी मित्रांनीच मैत्रिणीचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथे पैशांसाठी पोटच्या मुलीने तिच्या मित्राच्यामदतीने जन्मदाता आईच्या डोक्यात हातोडा मारुन आणि उशीने तोंड दाबून हत्या केल्या घटना उघडकीस आली. यानंतर आई घरातील मोरीत पाय घसरुन मृत्यू झालाच बनाव मुलीने रचला. मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त करुन पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला. चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल संजय गोखले (वय 45, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) ही हत्या झालेल्या आईचे नाव आहे. तर यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगाव शेरी) व योशिता संजय गोखले (वय 18, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद शाहू गाडे (वय 42, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेत योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी असून काही दिवसांपूर्वी मित्राच्या मदतीने मंगलच्या (आई) बँक खात्यातून त्यांना न सांगता परस्पर पैसे काढले. दरम्यान, हा प्रकारे आईला कळला तर ती रागवेल या भीतीने तिने थेट आईच्या खुनाचा कट रचला. यासाठी तिने तिचा मित्र यश शीतेळे याला घरी बोलवत त्याला घरातील हातोडा दिला. त्यावेळी योशिताने आईचे तोंड स्कार्फने दाबले होते. त्यानंतर आई पाय घसरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव रचण्यात आला. दरम्यान, मृत्यूबाबत नातेवाईकांना संशय आला. याबाबत त्यांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केला.
परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.