नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Updated: May 31, 2018, 11:16 PM IST
नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार  title=

पुणे : पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्यातल्या विमाननगर भागात हा प्रकार घडला. नो पार्कींगमध्ये असलेल्या गाड्या उचलण्यासाठी असलेला टोईग टेम्पो याठिकाणी आला. यावेळी एक दुचाकीस्वार आपल्या गाडीवर बसलेला होता. वाहतूक शाखेच्या कामगारांनी ही गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक दुचाकीवरून उतरायला तयार नव्हता. यावेळी वाहतूक पोलीस तसंच कर्मचारी यांनी शेवटी या चालकासह दुचाकी उचलली आणि सरळ टोईग टेम्पोमध्ये टाकलं. हा सारा प्रकार लोकांसमोर सुरू होता. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याच्याही प्रतिक्रिया आता व्यक्त होतायत.