पुण्यातील सशस्त्र दरोड्यातील आरोपी १२ तासात अटकेत

कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २४ लाखांचा माल लुटून नेला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2018, 11:40 AM IST
पुण्यातील सशस्त्र दरोड्यातील आरोपी १२ तासात अटकेत title=

पुणे : पुण्यातील रविवार पेठेत सोनाराच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलीसांच्या गुन्हे शाखेनं १२ तासाच्या आत अटक केली आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली होती. 

२४ लाखांचा माल लुटून नेला

रविवार पेठेतील पायल ज्वेलर्स या दुकानावर चौघांनी दरोडा टाकला होता. त्यात त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २४ लाखांचा माल लुटून नेला होता. त्यानंतर ते नेपाळमध्ये पसार होण्याच्या प्रयत्नात होते. 

चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद

या दरोडेखोरांची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना वापी इथून अटक केली. 

नेपाळला पळून जाण्याची तयारी

मनीष स्वार, मनोज बुगडी, प्रकाश खडका, देवेंद्र बहादूर अशी या चौघांची नावे आहेत. या चौघानी आरोपींनी दुकानमालक  मनोज जैन यांना कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील 700 ग्राम सोने, 30 हजार रुपये आणि 2 मोबाईल लुटून नेले होते. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.